Category: #marathi
-
आपल्या मुलांना आपण काय द्यायला हवे??
“मी नेहमीच शिकायला तयार असतो, पण मला नेहमी शिकवलेले आवडत नाही.” विस्टन चर्चिल आजकाल मूल जन्माला येतं त्या क्षणापासूनच खरं तर आपण त्याला/तिला काही न काही देत असतो. अर्थात, आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण, चांगल्या सोयीसुविधा, चांगलं शिक्षण या गोष्टी देणे हे आपलं कर्तव्यच असतं आणि हे कर्तव्य प्रत्येक पालक आपापल्या परीने पूर्ण करत असतो. किंबहुना…
-
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती खरंच महत्वाची असते का??
“तुमच्या भावना नक्कीच अनुभवा, पण त्यांना तुमच्या कृतीवर अधिकार गाजवू देवू नका!!” मागच्या लेखात आपण भावना म्हणजे काय आणि त्या ओळखायच्या कशा याबद्दल जाणून घेतले. आता आपण भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) या महत्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊया. खरंतर आत्तापर्यंत आपण बुद्धिमत्तेबद्दल खूप काही ऐकलं आहे. थोडक्यात सांगायचं तर अनेक गोष्टी शिकणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, योग्य…
-
तुम्हांला तुमच्या भावना ओळखता येतात का??
तुमच्या भावना सांभाळण्यापेक्षा त्या भावनांवरची तुमची प्रतिक्रिया सांभाळणं जास्त गरजेचं असतं!! समस्त सजीव प्राण्यांमध्ये माणूस विशेष ठरतो कारण त्याला बुद्धी आणि वाणीचं वरदान मिळालं आहे. याशिवाय आपल्याजवळ भावना नावाचं एक अद्भुत साधन देखील आहे, ज्यामुळे आपल्या जीवनाला वेगळा अर्थ प्राप्त होतो. तर नेमक्या काय असतात या भावना आणि भावनांबद्दल जाणून घेण्याची काय गरज आहे? म्हणजे…
-
आपण खरंच आनंदी आहोत का …??
आनंद हा एक प्रवास आहे, गंतव्यस्थान (लक्ष्य) नाही!! आपल्याला सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं आणि म्हणून आपण सतत आनंद शोधत असतो. कधी कधी आपल्याला आपला आनंद सापडतो देखील पण बरेचदा हा खूप कमी वेळ टिकतो आणि मग पुन्हा आपण त्याच आनंदाच्या शोधात अस्वस्थ राहतो. खरं तर आनंद हा खूप व्यक्तीसापेक्ष अनुभव आहे, म्हणजे नेमका कशातून आनंद…
-
सरसकट लेबल..!!
“समजून घेण्यापेक्षा लेबल लावणे नेहमीच सोपे असते.” शीर्षक वाचून गडबडलात ना?? म्हणजे ही काय इंग्रजी-मराठी ची खिचडी असं नक्कीच वाटलं असेल. पण इथे लेबल हा शब्द खरंच मी इंग्रजी अर्थानेच वापरला आहे. म्हणजे शाळेत असताना कसं आपण नवीन पुस्तक-वह्यांना कवर घालून त्यावर आपले नाव, वर्ग इत्यादि माहिती असणारे लेबल लावत असू, तसंच आजकाल आपण आपल्या…
-
आपल्याला पालकत्व “शिकण्याची” खरोखर गरज आहे का??
स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मागे एक पालक असतो ज्यांनी प्रथम त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असतो. अतिरेकी माहितीच्या या युगात जिथे आपण दररोज काय खावे, काय घालावे, कसे वागावे या सर्व गोष्टींबद्दल भरपूर माहितीचा सतत भडिमार होत असतो, तेथे त्या पैलूंबद्दल देखील आपण बहुतेकदा गोंधळलेले असतो जे अन्यथा आपल्याला खूप नैसर्गिक आणि क्षुल्लक वाटतात. पालकत्व…
-
नात्यांमधला गुंता सोडवायचा कसा??
जर आपण एकमेकांबद्दल न बोलता एकमेकांशी बोलू लागलो, तर जगातल्या बऱ्याचशा समस्या नाहीशा होतील!! आपण जन्माला येतो तेव्हापासूनच वेगवेगळ्या नात्यांशी आपली ओळख होते. काही नाती आपल्यासोबतच जन्माला येतात तर काही आपण आपल्या स्वतः साठी निवडतो पण अशी हि अनेक नाती अगदी मरेपर्यंत आपली सोबत करतात. आजकाल नातेसंबंधांविषयी खूप ओरड ऐकू येते. आधी कशी नाती खूप…
-
आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो का??
सवयीला जर वेळीच आवर घातला नाही तर ती गरज बनते!! “झोपेतून उठल्यावर हातात गरमागरम चहाचा कप आणि वर्तमानपत्र याशिवाय माझी सकाळच पूर्ण होत नाही.” “त्याला हाती घेतलेलं काम अपूर्ण ठेवायची घाणेरडी सवय आहे.” “छोटी दिशा तिच्या सगळ्या वस्तु अगदी नीट जागेवर ठेवते, किती छान सवय आहे ना तिला.” ही आणि अशी अनेक वाक्ये सतत आपल्या…
-
पालकत्वाच्या विविध शैली आणि त्यांचे परिणाम!!
“मुलं कधीच त्यांच्या मोठ्याचं निमूटपणे ऐकण्यात चांगली नसतात, परंतु मोठ्यांचं अनुकरण करण्यात मात्र ती कधीच चुकत नाहीत!!” अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता जेम्स बाल्डविन यांनी या वाक्यात खरंतर पालकत्वाच्या प्रवासातले एक महत्वाचे पण दुर्लक्षिलेले सत्यचं विषद केले आहे!! दुर्लक्षित अशासाठी कारण, आपल्या लहानपणापासूनच आपल्यावर मोठयांनी ऐकण्याचे संस्कार केले असतात आणि कळत-नकळत सवयीने आपणसुद्धा पालक झाल्यावर…
-
विचार-भावना आणि वर्तनाचे त्रिकुट !!
तुमचे विचार तुमच्या भावनांना प्रभावित करतात, तुमच्या भावना तुमच्या निर्णयांना प्रभावित करतात आणि तुमचे निर्णय तुमचं आयुष्य प्रभावित करतात. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात आणि आपण त्या घटनांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतो. खरं तर आपल्याला वाटत असतं की आपला हा प्रतिसाद त्या घटनेमुळेच निर्माण होतो. पण मानसशास्त्रात असे सांगितले जाते की हे…